पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
श्री सद्गगुगुरु संत बाळूमामा देवालय, गडदरवाडी, म्हसोबावस्ती, खंडोबाचीवाडी येथे उद्या दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अकराव्या अमावास्या भंडाऱ्याचा सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या देवालयाची स्थापना २९ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली असून, मंदिराचे बांधकाम बाळूमामा देवालय समिती व समस्त ग्रामस्थ गडदरवाडी, म्हसोबावस्ती, खंडोबाचीवाडी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. मंदिरासाठी लागणारी संपूर्ण जागा प्रकाश नामदेव गडदरे (निरा) यांनी भक्तीभावातून प्रदान केली आहे.
स्थापनेनंतर आजपर्यंत दहा अमावास्या भंडारा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले असून, प्रत्येकवेळी कीर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी अकरावा अमावास्या भंडारा कार्यक्रम उद्या मोठ्या उत्साहात पार पडणार असून, कीर्तन सेवा ह. भ. प. विकास महाराज देवडे यांच्या होणार आहे. किर्तन व महाप्रसादाचे सेवासौजन्य धनंजय पोपट गडदरे (माजी सरपंच, ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी) यांनी स्वीकारले आहे.
या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सद्गगुगुरु संत बाळूमामा देवालय गडदरवाडी, म्हसोबावस्ती, खंडोबाचीवाडी तर्फे करण्यात आले आहे.

0 Comments